मुंबई : आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाही. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यांच्या याच धमकीला काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्यांनी काही केलं नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मात्र आता फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार असल्याचा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिद घेऊन घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उलट चंद्रकांतदादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर होती पण मी ती नाकारल्याने माझ्यावर ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला. मुश्रीफांच्या प्रेसनंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफांचा दावा खोडून काढताना कायदेशीर लढाईला तयार रहा, असा इशार दिला. तर फक्त आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी त्यांनी काँग्रेसला दिला.
‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’
चंद्रकांतदादांच्या धमकीनंतर नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. नाना पटोले म्हणाले, “भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत नाही. किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत. काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही. आमच्या मंत्र्याची चूक नसल्याने घाबरण्याची गरज नाही, असेही पटोले म्हणाले. कॅबीनेटमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होऊन फडणवीसांच्या काळातल्या अनेक फाईल्स तयार आहेत. त्या आता काढल्या पाहिजेत, आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असंही नाना पटोले म्हणाले.
Read Also :
- चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा! चाकणकरांची उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
- सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
- शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
- ‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
- भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार