पुणे : ‘कोल्हापूरला जाऊन मुश्रीफ यांचे आणखीन काही घोटाळे बाहेर काढणार,’ असे म्हणणाऱ्या सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेल्यानंतर, या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. त्यांनतर सोमय्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन लवकरच मुश्रीफ यांचा तिसराही घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले.
‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली असून, ‘गडहिंग्लज साखर कारखान्यातल्या १०० कोटींच्या घोटाळ्याची माहिती आणि या संदर्भातील सगळे पुरावे मी उद्या ईडीकडे देणार असून, यासंदर्भात तक्रारही करणार आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी हा साखर कारखाना कसा काबीज केला, कसा बेनामी कंपनीला दिला, हे मी सांगणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे, मुश्रीफ गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ
तसेच, ‘मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून, या साखर कारखान्यात पवार यांचे जवळचे मित्र अतुल चोरडिया यांनी २३ कोटी दिले. कोणी गडहिंग्लजला पैसे देतं, कोणी पारनेरला. सगळेच उद्योगपती पवार कुटुंबियांचे मित्र आहेत का? याबाबत मी ईडीसोबत चर्चा करणार आहे आणि जरंडेशवर नंतर पारनेरच्या घोटाळ्याचेही पुरावे त्यांच्याकडे देणार आहे,’ असं म्हणत, ‘या घोटाळेबाज सरकारचा बुरखा फाडायचं जनतेनंच ठरवलं आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.
भाजपात प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटीलांनी मला ऑफर दिलीयं; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहामनातरी पाटील यांच्यावरही निशाणा साधला, “हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे. त्यांना आमचं आव्हान आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आहे. अजून कितीवेळा ठाकरे सरकारची दडपशाही सहन करणार? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, सोमय्या हे पुन्हा मुंबईला यायला निघाले असून, त्यांच्यावरच्या कारवाईनंतर भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आहेत.
Read Also :
- भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या