पुणे : ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं आहे. किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्याबाबत अजून एक खळबळजनक दावा केला आहे.
राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
Read Also :
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- भाजपात प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटीलांनी मला ऑफर दिलीयं; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्या केसालाही धक्का लावला तर दुसऱ्या दिवशी सरकार पाडेल – सोमय्या
- किरीट सोमय्याला कराडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात; रेल्वे स्थानकावर केली कारवाई