कोल्हापूर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावे, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही, सगळे आरोप खोटे आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणार!
मी 100 कोटीचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत आहे. आजच्या कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांच्या सीएची पदवी शंकास्पद आहे. सोमय्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या, असं उत्तर मुश्रीफांनी सोमय्यांना दिलं.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्या केसालाही धक्का लावला तर दुसऱ्या दिवशी सरकार पाडेल – सोमय्या
- किरीट सोमय्याला कराडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात; रेल्वे स्थानकावर केली कारवाई
- भाजप सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही!
- राज्य मंत्री नाही, तर प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होणार?
- भाजपा नाराज नगरसेवक रवि लांडगे वाढवताहेत राजकीय ‘बार्गेनिंग पॉवर’