सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याच्या आणि त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना स्थान मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, काँग्रेसने राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात मात्र त्यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राज्याचे राज्यकृषी मंत्री विश्वजीत कदम यांनी ‘प्रणिती शिंदे या भविष्यात राज्य मंत्री नाहीतर कॅबिनेट मंत्री होतील’ असे म्हटले आहे.
भाजपा नाराज नगरसेवक रवि लांडगे वाढवताहेत राजकीय ‘बार्गेनिंग पॉवर’
सोलापूरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला विश्वजीत कदम आणि प्रणिती शिंदे उपस्थित होते. यावेळी कदम यांनी शिंदे समर्थकांच्या उपस्थितीत, ‘पक्षाने त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. मात्र त्या आमच्यासोबत आल्या असत्या, तर मनापासून खूप आनंद झाला असता, पण कदाचित पुढे त्या कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री झाल्या, तर मला आश्चर्य वाटणार नाही. ‘देर आये दुरूस्त आये, ‘सबर का फल मिठा होता हैं,’ असे ते म्हणाले.
‘अजित पवारांचा खरा चेहरा उघडा पडला!’
तसेच, ‘आत्तापर्यंत जे घडले नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडत आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच ही महाविकास आघाडी झाली, जन्माला आली.’ त्यामुळे, सोलापूरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठोसाला ठोसा देऊन काम करायचे, ही ताकद नक्कीच तुमच्यात आहे. आपल्याला जोमाने कामाला लागावे लागणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
- राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण
- कुणीही कायमचा शत्रू नाही, काहीही चमत्कार होऊ शकतो!