पुणे : शुक्रवारी लखनौमध्ये GST परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘GST चे ३०-३२ हजार कोटी अजूनही राज्याला केंद्राकडून मिळालेले नाहीत,’ असं म्हणत, ‘पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणणार आहेत, याबाबदल काही माहिती नाही पण राज्याच्या अधिकारावर केंद्राने आणता कामा नये. राज्याचेही उत्पन्नाचे काही स्त्रोत आहेत,’ असं म्हणत राज्य सरकारचा या निर्णयाला विरोध असल्याचे सांगितले.
‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
दरम्यान, यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आता त्यांचा चेहरा उघडा झाला… आम्ही सांगत होतो, राज्यांनी त्यांचा टॅक्स कट केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार आहेत. गोवा आणि गुजरातमध्ये हेच आहे. पण ह्यांना पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समधून येणाऱ्या नगदी पैश्यावर राज्य चालवायचं आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणायला यांचा विरोध आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
तसेच त्यांनी, ‘मला हे कळत नाही, अजित पवार, हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुणे-पिंपरी चिंचवडचे? संपूर्ण महामारी काळात ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यात कधी गेले? की हे जिल्हे कुठे आहेत त्यांना महिती नाही?त्यांनी घोषित केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात होणार. उगाच ढोल वाजवण्याचं कारण नाही. प्रत्येकाचं आपलं प्लॅनिंग असतं. आम्हाला शांत राहून काम करण्याची सवय आहे. कितीही माणसं पळवलीत तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे,’ असा टोला त्यांनी लगावला.
कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
GST परिषदेच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी, ‘केंद्राने राज्याचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका घ्यावी. ‘वन नेशन, वन टॅक्स’ या कायद्यांतर्गत जी आश्वासनं दिली गेली, ती पाळली जावीत, असं मत व्यक्त केलं. तसेच, ‘माझं इतकंच म्हणणं आहे की, केंद्राने केंद्राचं काम करावं त्यांना जे टॅक्स लावण्याचे काम आहे ते लावावेत. पण राज्याला जो अधिकार दिला आहे त्या अधिकारावर कोणत्याही प्रकारे गदा आणता कामा नये, ते अधिकार कमी करता नये असंही ते म्हणाले.
Read Also :