मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. तसेच, त्यांच्याविरोधात असलेले तब्बल २७०० पानी पुरावे देखील त्यांनी आयकर विभागाकडे सादर केले. यांनतर आता यासंदर्भात मोठी घडामोड घडत असून, सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘अजित पवारांचा खरा चेहरा उघडा पडला!’
सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवास स्थानाला पोलिसांच्या छावणीचे रूप आले आहे. कारण, सोमय्या यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून, त्यात भर म्हणून मुंबई पोलीस दलाचा देखील कडक बंदोबस्त सोमय्या यांच्या घराबाहेर आहे. त्यानंतर सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरला जाण्यापासून मज्जाव करण्यासाठी ठाकरे सरकारने केलेले कारस्थान आहे,’ असं ते म्हणाले आहेत.
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
‘मला गणेश विसर्जनासाठी देखील मुंबईत आणि माझ्या घराबाहेर जाण्यास दिले जात नाहीये. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या अटकेसाठी एवढे पोलीस पाठवले आहेत. परंतु, या सरकारने कितीही पोलीस आणले आणि जेलमध्ये डांबले, तरी मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच! मुश्रीफ यांचा कोल्हापूर आणि अहमदनगर इथल्या साखर कारखान्याचा घोटाळा आणि अजित पवार यांचा घोटाळा देखील मी बाहेर काढणार!’ असे आव्हान त्यांनी दिले आहे.
दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जाणार, मग नंबर…सोमय्यांचा नवा दावा
दरम्यान, सोमय्या यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून, यात त्यांनी, ‘ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश. मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे,’ असं म्हटलं आहे.
Read Also :
- राज्य मंत्री नाही, तर प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होणार?
- ‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
- राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण