मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पण, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समर्थन केलं जात आहे.
शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एका विचाराची कधीच होऊ शकणार नाही, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनंत गीतेंनी केलेलं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही. मी तर पहिल्यापासून सांगतोय, ही अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
अनंत गीतेंच्या विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘संजय राऊत हे शिवसेनेचे की, राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करतात. पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे’, असं मुनगंटीवार म्हणाले.
Read Also :
- राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले; राज्यपालाचे मुख्यमंत्र्याकडे बोट, मुख्यमंत्र्याचे केंद्राकडे
- शरद पवार आमचे नेते होवून शकत नाहीत, पवारसाहेब देशाचे…..; संजय राऊतांचा स्पष्टीकरण
- जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, विजय मिळवून द्या; अजितदादांनी कंबर कसली
- शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, त्यातुन राष्ट्रवादीसोबत युती नको हाच आवाज येईल – सुधीर मुनगंटीवार
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत – शिवसेना