महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हि नाराजी दूर झाल्याची माहिती दिली आहे.
“उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आमचे नेते बाळासाहेब थोरात यांना संपर्क करुन झालेली चूक कबूल केली आहे व भविष्यात काळजी घेण्याची खात्री दिलेली आहे”.असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हि जाहिरात राज्य सरकारच्या धोरणांची जाहिरात असून यात तिन्ही पक्ष जाहिरातीत दिसावे हीच अपेक्षा होती मात्र याबाबत दिलगिरी केली असून तसेच तिन्ही पक्षात चंगला संवाद असल्याचे देखील ते म्हणाले.
महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजीत यांनी ट्वीट केले असेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. मात्र आता हि नाराजी दूर झाल्याची माहिती तांबेंनी दिली आहे.