नवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकारने अनलॉक-5 च्या मार्गदर्शक सुचना जारी जारी केल्या आहेत. केंद्राने नवीन नियमावलीमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट दिली आहे. विशेष म्हणजे शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय केंद्राने राज्यांवर सोडला आहे. 15 ऑक्टोंबरनंतर शाळा सुरू करता येतील मात्र यासाठी काही अटी आहेत.
GoI issues new guidelines for 'Re-opening'; cinema halls/multiplexes, swimming pools used for training of sportspersons & entertainment parks to re-open from 15th Oct
For re-opening of schools, States given flexibility to take a decision after Oct 15, parental consent required pic.twitter.com/KCoQ9E6HJr— ANI (@ANI) September 30, 2020
- केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकार शाळा, महाविद्यालये 15 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- सरकार शाळा किंवा शिक्षण संस्था व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करतील आणि दिलेल्या अटींचे पालन करतील.
- ऑनलाइन शिक्षणला प्रोत्साहन दिले जाईल. शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल.
- शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ पालकांच्या लेखी संमतीनेच लागू होईल.
- उच्च शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्रालय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्था उघडण्याचा निर्णय घेऊ शकतात.