नाशिक : राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी उद्यापासून (23 नोव्हेंबर) तयारी सुरू केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा स्थानिक स्तरावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत. यातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील शाळा 4 जानेवारीपर्यंत बंदच राहतील, असा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.
छगन भुजबळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शाळा 4 जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे.डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारी पर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील.@NCPspeaks@my_nmc#माझेकुटुंबमाझीजबाबदारी pic.twitter.com/r6slsZUPNH
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) November 22, 2020
छगन भुजबळ यांनी माहिती दिली की, नाशिक जिल्ह्यातही 19 तारखेपासून रुग्णवाढ सुरू झालेली आहे. हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे.डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारी पर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील.
दरम्यान, राज्यात शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादु्र्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करुनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.