रायगड : परंपरागत शेकडो वर्षे मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करत आले, त्यांच्याबद्दल कोणतीही चुकीची पद्धत खपवून घेतली जाणार नाही. माझ्या मच्छीमार बांधवांचा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व काम महायुती म्हणून सामुदायिक करणार आहोत. ती आमची बांधिलकी असणार आहे. पर्यटनावर आधारित रोजगार वाढेल. अद्यावत जेट्टी आपण एवढ्याचसाठी करत आहोत की याठिकाणी मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला बघण्यासाठी शिवप्रेमी, पर्यटक येतील. अशावेळी पायाभूत सुविधा करण्यासाठी पावले उचलत आहोत. मच्छीमार बांधवांवर अन्याय होत असेल, नुकसान भरपाई देण्याबाबत काही कमतरता रहात असेल तर ती भरुन काढण्यासाठी पुढच्या कालावधीत शंभर टक्के काम करणार आहोत, असा शब्द सुनील तटकरे यांनी मुरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिला. राजपुरी पंचायत समिती गणाची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“आढळरावांनी वाडा गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी पोहोचवला”
पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर हा परिसर बदलणार आहे. या बदलणार्या प्रवाहाबरोबर स्थानिक माणूस ठळकपणे दिसला पाहिजे. अनेक प्रकल्प येतात. उद्याच्या भविष्यात जे जे प्रकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमीपुत्र राहिल याची खबरदारी घेणार आहोत, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
एक हजार कोटीची जेट्टीची कामे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये अद्ययावत पद्धतीची जेट्टी मिळणार आहे. मच्छीमारी व्यवसाय सुरक्षित राहील. राज्यसरकारच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उभे केले जातील. सरकारला एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या काबाडकष्ट करणार्या माझ्या मच्छीमार बांधवांमुळे मिळते. मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम सागरमाला योजनेतंर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान मत्स्य योजना यापूर्वी कधी आणली गेली नाही अशी योजना देशाच्या पंतप्रधानांनी आणली आहे. या योजनेमध्ये अनेक व्यक्तिगत लाभार्थ्यांना, अनेक जेट्टींना थेटपणे अनुदान देण्याच्या योजना आहेत. हा सुनिल तटकरे तुमचा सेवक म्हणून या योजना राजपुरीच्या गणात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथे सोमवारी जाहीर सभा पार पडली असून पुणे जिल्हयातील सर्वच्या सर्व जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. या महायुतीच्या जाहीर सभेला आमदार महेंद्र दळवी, भाजप नेते महेश मोहिते,आदींसह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू’, संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये
हेही वाचा..“सुनेत्रा पवारांचा पायगुण चांगला, आताच तर इतकं, तर खासदार झाल्यात तर काय होईल विचार करा,”