मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठा वाद सुरु असताना हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार विजय पाटकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती स्वतः अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत देत या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हंटले आहे.
मी कलाकारांच देणं लागतो : विजय पाटकर
हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अभिनेते विजय पाटकर यांचं नाव खूप मोठं आहे. मात्र अचानकपने राष्ट्रवादीमध्ये केलेल्या प्रवेशामुळे पाटकर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र निवडणुकीबाबत कोणताही विचार नाही अशी प्रतिक्रिया अभिनेते विजय पाटकर यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मी सिनेसृष्टीमधे काम करत आहे. त्यामुळे मी कलाकारांचे देणे लागतो असे पाटकर यावेळी बोलताना म्हणाले तसेच राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे त्यामुळे सांस्कृतिक कामांनविषयी येत असलेल्या अडीअडचणी सरकार दरबारी थेट मांडता येतील आणि कलाकारांना त्यातून न्याय देता येईल यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.
अभिनेते विजय पाटकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसेच यावेळी पक्ष कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्यसह पक्षाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
आज, मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी @NCPspeaks पक्षात माझ्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे. pic.twitter.com/qppntBVMmx
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 9, 2020
Read Also
शिवसेना आता सोनिया – सेना बनली आहे, कंगनाकडून ट्विटर वॉर सुरुचhttps://t.co/DGYwnhDfMC@KanganaTeam @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020