मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते. यावेळी दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. बैठकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट आहे
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.
मात्र यावर बोलताना राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ‘राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व नसतं. आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदींना आपले नेते म्हणतात, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत.’ असे राऊत म्हणाले. दरम्यान संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Read Also :