मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा झाली.
आज बुधवार सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली, अर्धा तास बैठक चालली.
‘पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतल्याचे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले. त्यामुळे, पुरंदर येथील विमानतळासाठी जमिन अधिग्रहण कामाला लवकरच सुरुवात होईल, असे दिसून येत आहे.
पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. @rajnathsingh यांची भेट घेतली. pic.twitter.com/I4DoxjP27t
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 9, 2020