राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना, आता मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
महिलेने 10 जानेवारीला धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने महिलेला तिचे स्टेटमेंट एफिडेव्हिटमध्ये द्यावे असे सांगितले होते, जेणेकरून नंतर ते बदलता येणार नाही.
रेणू शर्मा या महिलेने मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे त्यांनी म्हटले आहे.
रेणू शर्मा यांच्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल. शरद पवार
तर दुसरीकडे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणू शर्माविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागमी त्यांनी केली आहे.