नाशिक : राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. सध्या राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3 पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या. आता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30-35 वर्षांपासून ऐकत आलोय, असे म्हणत शरद पवारांनी टोला लगावला. सोबतच ते पुढे म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्दत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्या का?, असा प्रश्न विचारला असता हा निर्णय इतर पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घ्यावा. जपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि लोकांना हे सरकार आवडतं आहे, असे पवार म्हणाले.