दिल्ली : माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं बोकं. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं होतं.
संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे-
“देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए )मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं,” अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडली. “शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व सोपविल्यास शिवसेनेसह रालोआतून (एनडीए) बाहेर पडलेल्या पक्षांसह देशभरातील भाजपविरोधातील पक्षही यूपीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करतील,” असं प्रतिपादन राऊत यांनी केले.
निरुपम यांचे प्रत्युत्तर –
“काँग्रेस पक्षाला दुगणे देत शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे ही शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते. कारण शिवसेनेने सातत्याने काँग्रेसवर टीकाटिप्पणी केल्यास काँग्रेस नेतृत्वाकडून पाठिंब्याबाबत फेरविचार होऊ शकतो. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेला चिंता असली तरी शिवसेना या आघाडीत आहेच कुठे?,” असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला.