IMPIMP
sharad-pawars-group-suffered-a-major-blow-due-to-a-commission-blunder sharad-pawars-group-suffered-a-major-blow-due-to-a-commission-blunder

आयोगाच्या एका घोळमुळे शरद पवार गटाला मोठा फटका , तब्बल ४ लाख १४ हजार मताचा तोटा

पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात लोकसभेची निवडणुक झाली. यामध्ये निवडणुक आयोगाने शरद पवार गटाने तुतारी वाजवणारा माणुस हे चिन्ह दिले. त्यावरच शरद पवार गटाने लोकसभेची निवडणुक लढवली. मात्र शरद पवारांनी दिलेल्या मतदारसंघात निवडणुक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना ट्रंपेट हे चिन्ह दिलं होतं. त्याचं मराठीत तुतारी असं भाषांतर करण्यात आलं. त्यामुळे याचा शरद पवार गटाला मोठा फटका बसला. तब्बल ४ लाख १४ हजार मते तुतारी या सदृश्य चिन्हाला मिळाली.

हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ? 

यामध्ये बारामती मतदारसंघात सोयलशहा शेख १४ हजार ९१७ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर २८ हजार ३३० मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नगरमध्ये मोहन आळेकर ४४ हजार ५९७ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. रावेरमध्ये एकनाथ साळुंखे ४३ हजार ९८२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.

हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला 

वर्ध्यात मोहन रायकवर २० हजार ७९५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर माढ्यात रामचंद्र घुटुकडे यांनी ५८ हजार ४२१ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर साताऱ्यात संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते मिळाली. तरीही शरद पवार गटाने दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला. यामध्ये फक्त सातारा आणि रावेरची जागा गेली.

दरम्यान,  साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे तर पराभूत झाले. साताऱ्यात तुतारी सदृश चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला ,३७,०६२ मते मिळाली. तर शिंदे यांचा ३२,७७१ मतांनी पराभव झाला इतर ८ ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या मतधिक्यावर या गोष्टीचा मोठा परिणाम झाला.

READ ALSO :

हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले.. 

हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ 

हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद 

हेही वाचा..केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी गडकरींपेक्षा चांगला पर्याय नाही