नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्थलांतरित मजुर ते शेतकरी आत्महत्येपर्यंत डाटा उपलब्ध नसल्याचं सांगितलं. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी निशाणा साधला आहे. केंद्रातील एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल, असे नामकरण थरूर यांनी केले आहे.
No #data on migrant workers, no data on farmer suicides, wrong data on fiscal stimulus, dubious data on #Covid deaths, cloudy data on GDP growth — this Government gives a whole new meaning to the term #NDA! pic.twitter.com/SDl0z4Hima
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 22, 2020
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी यासंदर्भातील एक कार्टुनसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात ते म्हणतात . या सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. महसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. कोरोनामुळे् झालेल्या मृत्यूंचा संशयास्पद आकडा, जीडीपीच्या वाढीबाबतची गोंधळ वाढवणारी आकडेवारी, यामधून सरकारने आपल्या एनडीए या नावाला नवा अर्थ दिला आहे. तो म्हणजे नो डाटा अव्हेलेबल. असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झालेल्या मजुरांच्या संदर्भातील आकडेवारी ही सरकारकडे उपलब्ध नाही आहे. संगिता कुमारी देव, भोला सिंह, कलानिधी वीरस्वामी आणि काही अन्य सदस्यांनी लॉकडाऊन दरम्यान हजारे मजुरांचा मृत्यू झाला आहे का आणि जर झाला असेल तर त्याचे विवरण द्या, अशी मागणी केली होती.
Read Also :