मुंबई : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, एकनाथ शिंदे, राज्यपाल आणि 16 शिवसेनेच्या अपात्रतेविषयी याचिकांवर सुनावणी सुरू आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरू असलेल्या याप्रकरणावर आता पाच घटनापीठांसमोर हे प्रकरण गेले आहेत. दोन्ही बाजूंनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. मात्र यावेळी ठाकरे यांच्या बाजूचे वकिल कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांना एका मुद्यावरून कोंडीत पकडलं आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची मस्ती वाढलीय..! जयंत पाटील यांची सडकून टीका
उद्धव ठाकरे हे 2018 ते 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत. असे कागदपत्र उपलब्ध आहेत. परंतु जे एकनाथ शिंदे हे आपलीच खरी शिवसेना आहे असे सांगत आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेचे साधे प्राथमिक सदस्यत्व सुद्धा नाही आहे. शिंदेंना स्वत: हून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले होते. ते निवडून आलेले नाहीत तर नामनिर्देशित सदस्य होते. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
“अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ”; भाजपचा शिवसेनेला इशारा
एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै पुर्वीच सदस्यत्व सोडले होते. निवडणुक आयोग त्यानंतर झालेल्या गोष्टींकडे पाहतोय. परंतु, त्यांच्यापुर्वीच्या गोष्टी कशा दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात, असं सिब्बल म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पक्षाची फसवणुक करून विरोधी पक्षाशी युती केली. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे शिंदेंचे विधानसभेतील सदस्यत्व देखील अपात्र ठरते असा युक्तिवाद देखील त्यांनी केला.
“शाळेमध्ये जिला आम्ही पाहिलं नाही, त्या शारदा मातेचा फोटो लावला जातोय”; छगन भुजबळ
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भविष्यतव्याचा निकाल लागणार आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील तसेच देशातील सगळ्याच लोकांना लागून राहिली आहे.
Read also
- “कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
- “मंत्रालयातून संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- माझा आई भवानीवर अन् न्यायालयावर विश्वास, लढाई आम्हीच जिंकू..! उद्धव ठाकरे
- राऊतांना दिलासा नाहीच..! दसरा मेळाव्याचं भाषण ही तुरूंगातून पाहणार?
- “शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार?” सुप्रीम कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद