ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये ट्विटरवर चांगलेच वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळाले.शिवसेनेच्या आयटी सेलने कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही केली आहे.
शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
Maharashtra: Shiv Sena IT Cell files a complaint at Shrinagar Police Station in Thane against Kangana Ranaut seeking FIR against her under 'charges of sedition for her Pakistan occupied Kashmir (PoK) analogy for Mumbai'. pic.twitter.com/wiiFkWBIFm
— ANI (@ANI) September 8, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळलं. इतकंच नाही तर कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. त्यातच संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ म्हटल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळाल्याचं दिसून येत आहे.