पालघर : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती.
मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय? – भाजप
डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.
माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही – नितीन गडकरी
डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार होते. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध होता
संत वचन, शेरोशायरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फटाकेबाजी
दरम्यान, शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक उमेदवाराला डावलून खासदार राजेंद्र गावित यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिल्याने शिवसेनेत आणखी बंडखोरीची भीती होती. अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवून राजेंद्र गावित याठिकाणी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी हा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत असे. या मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, राजेंद्र गावित यांनी 2018 मध्ये हे वर्चस्व मोडून काढत भाजपला विजय मिळवून दिला होता.
Read Also :
- नागपूरात अनिल देशमुखांना जोर का झटका; नगरखेड पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले
- धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दणदणीत विजय; धरती देवरे यांच्या झेंडा फडकला
- अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
- जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाचा झेंडा फडकणार?
- पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा राज्य सरकारला घरचा आहेर!