मुंबई: राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. लपून-छपून आणि पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शिवसेनेनं थेट रणांगणात यावं, त्यांना चारी मुंड्या चित करू. अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.
लपून-छपून आणि पोलिसांच्या आड राहून महिलेवर हल्ला करून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शिवसेनेनं थेट रणांगणात यावं, त्यांना चारी मुंड्या चित करू. यापुढे जशास तसे उत्तर देऊ
– माजी मंत्री व आ. @ShelarAshish pic.twitter.com/r8zG3w4A48— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 16, 2021
हे पण वाचा: मराठा आरक्षण : संभाजीराजेंनी ठेवली अजित पवारांसमोर अट, “मी चर्चेला येईनच मात्र…”
कोण आहेत अक्षता तेंडुलकर?
अक्षता तेंडुलकर या भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा आहेत. अक्षया तेंडुलकर यांची गेल्या वर्षी माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्य केले आहे. भाजप माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची माहिम विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली.