मुंबई : अभेनेत्री कंगना रानौतने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईमध्ये राहून पैसे कमावतात अन मुंबाआईच्याच पाठीत वार करतात असे म्हणत त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
मुंबई मघे येऊन रहातात,पैसा ,प्रसिद्धी मिळवतात आणि मुंबईचा अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात…निषेघ आहे ह्या कृतघ्न वृत्तीचा ..
— Adesh Bandekar – आदेश बांदेकर (@aadeshbandekar) September 4, 2020
कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी टीका केली आहे. कलाविश्वातील कलाकारांनीही तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहे केली आहे. आता याबाबत शिवसेना नेते आदेश बांधेकर यांनही कंगनाला सुनावले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हणाले, ” मुंबई मघे येऊन रहातात,पैसा ,प्रसिद्धी मिळवतात आणि मुंबईचा अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात.निषेघ आहे ह्या कृतघ्न वृत्तीचा , ” अशा शब्दात बांदेकर यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीहि कंगनावर हल्लाबोल केला आहे. कंगना या काही मेंटल केस असल्याची टीका त्यांनी केली आहे तर भाजप नेते राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली आहे. कंगनामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप प्रत्यारोपांची मालिका पहिला मिळत आहे.