शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत हे सध्या जोरदार चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सामना रोखठोक मध्य शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. सध्या राज्यात चालेल्या राजकारणावरून आणि कोरोना संकटावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवार यांचे मत जाणून घेतले
तसेच नुकतीच संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला.
सध्या संजय राऊत घेत असलेल्या या मुलाखतींमुळे ते राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहेत. तसेच ते त्यांचे टीकास्त्र सोडती भाजपला नेहमीच धारेवर धरत असतात.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदाच चर्चेत आले आहेत. राऊत यांनी आज नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साँप तो युही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं!’ नागपंचमीच्या शुभेच्छा, असे ट्विट राऊत यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.