IMPIMP
eknath shinde eknath shinde

साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

नाशिक : राज्यात विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आता जाहीर झाला आहे. यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल ३० तासानंतर संपली असून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडणूक आयोगाने विजयी घोषीत केले आहे. दराडे यांना विजयी घोषीत केल्यानंतर महायुतीचे पदाधिकारी आणि दराडे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

किशोर दराडे यांना विजयी घोषीत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. यावेळी साहेब तुमचा शब्द खरा ठरवला. उबाठा तीन नंबरवर. महाविकास आघाडीचा दारूण पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. असे किशोर दराडे यांनी सांगितले.

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी केले होते. त्यापैकी ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७० मते अवैध ठरली. मतमोजणी तब्बल ३० तास सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा वाटा पुर्ण केल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली.

READ ALSO :

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

हेही वाचा…सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

Leave a Reply