मुंबई : क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांना निवृत्तीनंतर ३३ वर्षांपूर्वी राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुल येथे मोक्याच्या ठिकाणी दिलेल्या भूखंडावर क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. मात्र पुढील तीन वर्षांत भूखंडावर बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू करण्याचे बंधन घालण्यात गावस्कर यांच्यावर आले आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गावस्कर नसते तर आपण म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता असं सांगत टीका केली आहे.
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2021
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं असून आतातरी सुनिल गावस्करांनी क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा असल्याचं म्हटलं आहे. “गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2021
“जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्यांना आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. “ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले, त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला. स्टेडियममधून रडत बाहेर पडलो होतो,” अशी आठवणही आव्हाडांनी सांगितली आहे.
Read Also :
- वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटीचा ठेका कुणासाठी? राणे
- ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस
- महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला? सुरेखा पुणेकर संतापल्या
- .ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस
- मोदी आणि फडणवीस ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, आंदोलन केवळ नौटंकीसाठी – नाना पटोले