सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ 24 जुलै रोजी डिजनी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शनानंतर चाहते, समीक्षक आणि बॉलिवूड कलाकरांकडून या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळत आहे. हा सिनेमा सुशांतच्या चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. दिल बेचारा या सिनेमा सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर चाहत्यांना भावूक केले आहे. सिनेमा प्रदर्शनानंतर काही तासांतच या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत या सिनेमाला IMDB रॅंकिंग 10/10 मिळाले. सध्या रँकिंग 9.8 इतके आहे. इतर बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत हे रॅकिंग अव्वल आहे.
दिल बेचारा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री संजना संघी देखील सुशांतच्या आठवणीत भावूक झाली आहे. संजना संघी या सिनेमात प्रमुख भूमिका असून हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. स्क्रीप्ट न वाचताच केवळ मैत्रीखातर सुशांतने हा सिनेमा केल्याचे सिनेमाचे दिग्दर्शक आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबड़ा यांनी सांगितले आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावा लागला. दरम्यान, सुशांतच्या चाहत्यांनी आयएमडीबीवर टॉप रॅंकिंग देत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.