मुंबई : सुशांतच्या मृत्यूवरून जितक्या शक्यता वर्तवला जातील तितक्या शक्यता वर्तवून झाल्या आहेत. त्यातच आता आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला संपत्तीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे का? या अनुषगांने या प्रकरणाची तपासणी करा अशी मागणी शिवसेना नेत्यानं केली आहे.
एम्सनं दिलेल्या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट झालं असतानाच सुशांतची बहिण बनावट ड्रिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरूनच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुशांतच्या कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विटच्या आधारे या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शनआधारे नशेची औषधे त्याला देत होते, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, सुशांतच्या मुंबईतील संपत्तीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला कुटुंबीयांनी प्रवृत्त केलं का? याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा,’ अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे
Read Also:
राज्यात अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार !https://t.co/LsJr7R1Mwp#MahavikasAaghadi @raosahebdanve
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020