IMPIMP
Take me now to discuss seat allocation, ask for 100 seats Kadam's demand to Shinde Take me now to discuss seat allocation, ask for 100 seats Kadam's demand to Shinde

“जागावाटपाची बोलणी करायला आता मला घेऊन चला, १०० सिट्स मागा”, कदमांची शिंदेंकडे मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिवस दोन्ही गटाने मुंबईत साजरा केला. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले. तर शिंदें साहेबांना हात जोडून विनंती आहे की विधानसभेला महायुतीकडून आपल्याला १०० जागा मागून घ्या. अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भर व्यासपीठावर केली.

हेही वाचा..“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

शिवसेनेच्या ५८ वा वर्धापन दिनाचा सोहळा शिंदे गटाने एमएससीआय डोम येथे तर ठाकरेंचा माटुंगा येथील षण्ममुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दमदार भाषणं केलीत. तर यावेळी शिंदे साहेब हात जोडून विनंती आहे. त्या मोदी-शाह साहेबांना सांगा. जशा भाजपच्या सीटा दोन महिने आधी जाहीर केल्या. तशा आमच्या सीटा करू दिल्या असत्या तर आज चित्र वेगळे दिसले असते. आता विधानसभेला आपल्याला १०० सिट्स मागून घ्या. असं रामदास कदमांनी मागणी केलीय.

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

पुढे बोलतांना रामदास कदम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत नाशिक, हिंगोली, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार जाहीर करण्यास झालेल्या विलंब केला नसता आणि या जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळेच चित्र दिसले असते. पण एकनाथ शिंदे यांनी उमेदवार जाहीर करायचा अवकाश की भाजपचे नेते लगेच संबंधित जागांवर दावा सांगायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत तशी परिस्थिती उद्धवू नये म्हणून जागावाटपाची बोलणी करायला मला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेऊन चला. असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी रामदास कदम यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं. असेही रामदास कदम म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…“मोदींना आमंत्रण देतोय, विधानसभेला प्रचार आतापासून सुरू करा”, ठाकरेंनी मोदींना डिवचलं 

हेही वाचा..कार्यक्रम सुरू असताना वीज गेली, लंकेंनी थेट कार्यक्रमातच वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला झापलं 

हेही वाचा..लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू 

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

हेही वाचा…“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार 

Leave a Reply