मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ब्रीच कॅन्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 16 दिवसापासून त्यांच्यावर ब्रीच कॅंन्डी रूग्णालयात उपचार सुरू होते. 3 जानेवारी रोजी परळी शहरात त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या छातीला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर आता त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला असून पुढील दिवस आराम करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.
याच दरम्यान धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपुर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ब्रीच कॅंन्डी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांसोबतच इतर राजकीय पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या तब्येती विचारपुर करण्यासाठी रूग्णालयात गेले होते. तर भाजप नेत्या आणि त्यांच्या बहिण पंकजा मुंडे ह्या देखील रूग्णालयात गेल्या होत्या.
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली..! बिनविरोध की थेट लढत होणार?
धनंजय मुंडे यांनी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज ब्रीच कॅंन्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार असून या काळात आपल्याला भेटता येणार नाही. मात्र लवकरच आपल्या सर्वांना भेटायला व जनसेवेत रूजू व्हायला परळीला येईन. मी रूग्णालयात असताना राजकीय, सामाजिक , अध्यात्मिक, पत्रकारिता आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी काळजी व्यक्त करत विचारपुर केली. त्या सर्वांचे तसेच रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”
- “..म्हणून एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार”; अनिल देशमुख लवकरच भेटीला
- आजोबांकडून सतत अन्याय होत असल्याची भावना, त्यामुळेच पार्श पवार अन् शंभुराज देसाईंची भेट
- “एका बाजूला सन्मानाचे पोस्टर, तर दुसऱ्या बाजूला झुकते माफ..! मोदींच्या मुंबईतील पोस्टरची सर्वत्र चर्चा
- नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा..! तब्बल 38, 000 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन अन् पायाभरणी