राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कुटुंब दुःखात असताना देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याविषयी कर्तव्य दक्षता दाखवून आपले काम सुरूच ठेवले. यामुळेच आरोग्य मंत्र्यांची कर्तव्यनिष्ठा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी त्यांच्याविषयी एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये रोहीत पवार यांनी या प्रसंगामुळे मला कोंढाण्यावर स्वारी करायला निघालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचीच आठवण झाली असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हणालेत रोहीत पवार नेमकं आपल्या ट्विटमध्ये –
साहेब तुमच्या कर्तव्यनिष्ठेपुढं मी नतमस्तक आहे. मातृछत्र हरपल्याचं डोंगराएवढं दुःख दूर सारत आपण रोजच्याप्रमाणे कोरोनाबाबतच्या आकडेवारीची राज्याला माहिती दिली.
मला तर मुलाचं लग्न मागं ठेवून कोंढाण्यावर स्वारी करायला निघालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचीच आठवण झाली.
.@rajeshtope11 साहेब तुमच्या कर्तव्यनिष्ठेपुढं मी नतमस्तक आहे. मातृछत्र हरपल्याचं डोंगराएवढं दुःख दूर सारत आपण रोजच्याप्रमाणे कोरोनाबाबतच्या आकडेवारीची राज्याला माहिती दिली.
मला तर मुलाचं लग्न मागं ठेवून कोंढाण्यावर स्वारी करायला निघालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचीच आठवण झाली. https://t.co/GGq03UE2k0— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2020