IMPIMP
The budget is a flood of promises and a flood of slaps, Thackeray's harsh criticism The budget is a flood of promises and a flood of slaps, Thackeray's harsh criticism

“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला आहे. त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत. तरीदेखील जनता त्यांच्या थापांवर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र हे उघड झालं आहे. अशी खरमरीत टिका उद्धव ठाकरे यांनी महायुतीने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर दिली आहे.

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यावर ठाकरे म्हणाले की, यांचा प्रयत्न हाच आहे की, काहीतरी धुळफेक करायची, जनतेला फसावायचं आणि रेटून खोटं बोलायचं. पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला लुबाडायचं. निवडणूक जवळ आल्यानंतर अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृत्ती होती. आणि थापांचा महापुर आहे. त्यामध्ये सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडून न्यायचा. ज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर खोटं नरेटिव्ह म्हणतात. असं अर्थसंकल्पाचं वर्ण करावं लागेल. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार. याबाबत कुठेही उल्लेख नाही. अशी टिप्पणी देखील त्यांनी केलीय.

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. त्यावरून देखील ठाकरेंनी जोरदार प्रहार केला आहे. आमची मागणी आहे की, त्यांनी गेल्या दोन वर्षात आजपर्यंत ज्या घोषणा केल्या. त्या खरोखर किती अंमलात आणल्या. याबाबत तज्ज्ञांची कमिटी नेमून श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की, ज्या घोषीत झाल्या पण प्रत्यक्षात आल्या नाहीत. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट असं की महिलांना जरा मतदानात आपल्या बाजूने करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहिण या योजना आणत असाल तर जरूर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी देखील काही आणा. असेही त्यांनी म्हटलं.

READ ALSO :

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

Leave a Reply