IMPIMP
The Dada of Baramati should be changed now, give Yugendra Pawar the Vidhan Sabha candidature The Dada of Baramati should be changed now, give Yugendra Pawar the Vidhan Sabha candidature

“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर आता राजकीय हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. यातच काल झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन राज्यमंत्री करण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला आज गोविंद बागेत बारामती आता दादा आम्हाला बदलायचा आहे. युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या. अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा बारामतीची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर झालेल्या लोकसभेत बारामतीत अजित पवारांच्या विरोधात संपुर्ण पवार कुटुबियांनी शरद पवारांची साथ दिली. याच दरम्यान, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार देखील राजकारणात सक्रीय झालेत. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार देखील केला. यातच आता युगेंद्र पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या. अशी मागणीच कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे.

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

पक्ष फुटल्यानंतर युगेंद्र पवार यांनी राजकारणात विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. ते आता सातत्याने बारामतीच्या पक्ष कार्यालयात येत आहेत. लोकांची कामे, समस्या जाणून घेतांना दिसत आहेत. यातच आता अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभेत शरद पवार गट उमेदवार देणार का ? आणि दिलाच तर तो पवार घराण्यातीच देणार का ? याची चर्चा आता राजकारणात सुरू झाली आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा मावळमधून श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाल्यात. आता विधानसभेला अजित पवार युगेंद्र पवारांकडून पराभूत होणार का ? अशीही शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले