सोलापूर: रविवारी दुपारी कानडगाव शिवारातील कालव्यांची पहाणी ना. पाटील यांनी केली असुन कामात गती येण्यासाठी अधिका-यांना देखील वेगवेगळ्या सुचना केल्या आहेत.याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक क्षेत्रातील शेतकरी उपस्थिती होते. उजनी धरणातील पाण्यावरून सध्या सोलापूर आणि इंदापूर मध्ये मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. इंदापूरचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली राजकीय शक्ती वापरून इंदापूर ला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार यांनी एकत्र येऊन मोठा विरोध केल्याने हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला.
सोलापूर जिल्ह्यातील आणि इंदापूर तालुक्यातील शेतकरी एकमेकांच्या विरोधात आता आंदोलनाचा पावित्रा घेत आहेत. गेल्या १३ दिवसांपासून उजनी धरणाच्या गेटवर आंदोलन चालू आहे. या आंदोलनात आज जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी कुटुंबासहित भाग घेतला आहे. त्यांच्या पत्नी. मोहोळ पंचायत समिती उपसभापती साधना देशमुख, मुलगी सृष्टी देशमुख, मुलगा शंभूराजे देशमुख या आंदोलनात सहभागी झाले आहेत. उजनीच्या पाण्याच्या बाबतीत लेखी पत्र द्या अन्यथा महिला हातात लाटणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारतील,असे देखील त्या म्हटल्या आहेत.
इंदापूर तालुक्याप्रमाणेच आता सोलापुरातील गावोगावचे शेतकरी पेटून उठले आहेत. आज टाकळी,वडोली,उजनी,पांढरेवाडी,कविटगांव यासह ५३ ग्रामपंचायतींनी ठराव समक्ष दिले आहेत. शासन उजनीच्या पाण्याबाबतीत लेखी आदेश काढत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, टाकळी पार्टीप्रमुख तानाजी सलगर, सरपंच हरि माने, वडोलीचे सरपंच भैय्या गाडे, भारत माने सर, औदुंबर घाडगे, उजनी (मा) सरपंच अविनाश निकम, शिवाजी जाधव, सदस्य बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, कुलदीप पाटील,अक्षय शिंदे, विष्णु तात्या बिचकुले, यांच्यासह अनेक पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.