पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यातच शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर देत सुनेत्रा पवार या बाहेरच्या असल्याचं म्हटलं. त्यावर आता महायुतीकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. काही विरोधकांनी याविरोधात संतापही व्यक्त केलाय. अशातच आता पुणे शहाराध्यक्ष प्रंशात जगताप यांनी यावर पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला
प्रशांत जगताप म्हणाले की, जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं, भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला. पण एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रुला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन् अंहकारी की ज्याला स्वत : ला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय. भाऊ शत्रुला जाऊन मिळाला.
हेही वाचा…“धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण,” अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, भाऊ शत्रुला जाऊन मिळाला. पण का ? तेच कळेना. काय हवं होतं या भावाला ? काय द्यायचं बाकी होतं.? जीवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं… काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं ? आपल्या बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येतेय हे पाहताच भावाच्या फितुरीचं दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली, विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन् आपल्या बापाची ढाल झाली… ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय..! सांगा…. काय चुकलं तीचं ? असा सवालही त्यांनी केलाय.
काय चुकलं तीचं ?
जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला.
पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन्… pic.twitter.com/zfp6jVeYZA— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 13, 2024
READ ALSO :
हेही वाचा…““..त्यामुळेच मला पुण्याचा खासदार व्हायचंय”, वसंत मोरेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…“सुपारी वाजवणारा” अशी पदवी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना दिली, कुणी डिवचलं ?
हेही वाचा…“अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही”