पुणे : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघडकीस येत असल्याने ते वैफल्यग्रस्त अवस्थेत पुरावा नसलेले बिनबुडाचे आरोप करीत आहेत. दररोज उठून आरोप करायचे आणि नंतर सारवासारव करायची या मलिकांच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे. मंत्री म्हणून त्यांना काहीच काम राहिलेले नाही. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मलिक यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आज कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. त्यावेळी मुळीक बोलत होते.
हायड्रोजन सोडा, नवाब मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल – आशिष शेलार
मुळीक पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अशा नेत्यावर चिखलफेक करण्याचे काम मलिक करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जनाधार दिला होता. अशा नेत्यावर टीका करण्याची मलिक यांची योग्यता नाही.
नवाब बेनकाब !
देशद्रोही 'नवाब' हीच तुमची लायकी. महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईत देशद्रोही पिलावळ पाळणाऱ्या आणि ड्रग माफियांना पाठीशी घालून महाराष्ट्राच्या तरुणाईला देशोधडीला लावणाऱ्या @nawabmalikncp यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.@BJP4Maharashtra @BJYM @Dev_Fadnavis pic.twitter.com/dKAfihCge7— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) November 10, 2021
मुळीक म्हणाले, ‘मलिकांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या व्यवहारात अटक करण्यात आली. त्याला निर्दोष सिद्ध करण्याच्या नादात सूडाच्या भावनेने सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन करीत आहेत. मात्र या नादात ते स्वतः अडकले असून त्यांचे अंडरवर्ल्ड बरोबरचे संबंध उघडकीस आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल.’
Read Also :
- किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? – प्रविण दरेकर
- सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही; भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा निर्धार
- आम्हाला गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; निलंबित एसटी कामगारांचा सरकारला इशारा
- एसटी आंदोलन चिघळले: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक, मंत्रालयाजवळ पोलिसांचा फौजफाटा
- एसटी कर्मचाऱ्यांनो प्रवाशांना वेठीस धरू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन