बीड : जिल्ह्यातील करोना परिस्थिती गंभीर होत असून, वाढती करोना रुग्णसंख्या आणि रेमडिसीवीर इंजेक्शन तुटवडा, लशीची उपलब्धी यावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात चांगलेच ट्विटर युद्ध सुरू झाले आहे. याची सुरुवात झाली ती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना लिहिलेल्या पत्रापासून. तसेच, बीडच्या पालकमंत्र्यांचं लक्ष आहे कुठे, असा सवाल करत त्यांनी, जिल्ह्यात माफियाराज होत असल्याचा आरोप ट्विट करून केला होता.
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021
यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनीही ट्विट करत, लसींच्या असमतोल वाटपाचा निषेध केला होता. तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे, हा असमतोल आपणच दूर करावा अशी मागणी करत, माफियांची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मांत्रीकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही, असे म्हणत धंनजय मुंडेंवर टीका केली होती.
केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लसीपैकी बीडच्या वाटणीला केवळ 20 लसी हे निषेधार्ह आहे. हा असमतोल आपणच दूर करावा @CMOMaharashtra @rajeshtope11
कारण माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही@drharshvardhan pic.twitter.com/Fo8ssiltcN
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 15, 2021
यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट्सची मालिका पाठवत आपल्या दोन्ही चुलत बहिणींना, “ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असं ट्विट करत निशाणा साधला होता.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde @DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
तसेच प्रीतम मुंडे यांचं नाव घेऊन ट्विट करत, “अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” अशी टीका त्यांनी केली होती व ट्विटसोबत एक तक्तादेखील जोडला होता.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
यावेळी धंनजय मुंडे यांनी, आपल्या दिनही चुलत बहिणींना राजकारण इतर ठिकाणी जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे करू नका, असा सल्ला दिला होता.
जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
त्यांच्या या ट्विट्सच्या प्रत्युत्तरादाखल पंकजा मुंडे यांनी, ही पत्र लिहीन आणि त्यांची दाखल देखील घेतली जाईल! तुम्ही मात्र बीड मध्ये दमडीही आणली नाही. माफिया मात्र आणले, कमीत कमी जुन्या निधीचे काम तरी करा आणि उदघाटन करा, हक्क तुमचाच आहे, अशी बोचती टीका केली.
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
याला भगिनी प्रीतम मुंडे यांनीही साथ देऊन, अधिकाऱ्यांना घरी बोलावून माफियांच्या पाय पडायला लावण्यापेक्षा कोविद वॉर्डमध्ये जा आणि परिस्थितीची पाहणी करा असा, प्रतिसल्ला धंनजय मुंडेंना दिला.
#Vaccine देखील पुरेसे दिले नाहीत..जाग आहेच कारण पीपीई किट परिधान करून पाहणी मी स्वतः केली आहे..जाग आणि शुद्ध दोन्हीही ठेऊन काम करावे अधिकार्यांना घरी बोलावून माफियांच्या पाया पडायला लावण्यापेक्षा कोविड वार्डमध्ये जा @dhananjay_munde
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 16, 2021
हे युद्ध एवढ्यावरच थांबले नाही तर धंनजय मुंडे यांनी परत एक ट्विट करत, आपण शेअर केलेल्या २० लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे, आरग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लास मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवाल केला आहे. दिवसभर रंगलेल्या या ट्विटर युद्धामुळे कुणाचे नुकसान झाले नसले तरी एकंदरीत राज्यात करोना परिस्थती अतिशय गंभीर असून, सगळीकडेच आरोग्य यंत्रणेचा गोंधळ आणि आरोग्य सुविधांची प्रचंड कमतरता असल्याचे मात्र दिसून आले आहे.
कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? pic.twitter.com/ZvCMfMdW76
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021