राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर नातवाला म्हणजे पार्थ पवार याना फटकारल्यानंतर उपमुख्यमनतरी अजित पवार आणि जयंत पाटील हे काळ संध्याकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी गेले होते. तेथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकींनंतर जयंत पाटील यांनी खुलासा केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या कुटूंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली
“आमची सिल्व्हर ओकवर ठरलेली बैठक होती. पार्थ संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. पार्थ यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.