IMPIMP
bjp bjp

मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याच्या संभाजीराजेंच्या आवाहनाला ‘या’ खासदारांनी दिला प्रतिसाद

 

नवीदिल्ली : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी समाजाच्या वतीने केले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ज्या खासदारांनी पाठिंबा दिला त्यांची नावे संभाजीराजेंनी स्वतः सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत.

या खासदारांचा मराठा आरक्षणाला पाठींबा

खा. श्रीरंग आप्पा बारणे ( मावळ )
खा. हेमंत आप्पा गोडसे ( नाशिक )
खा. डॉ. श्रीकांत शिंदे ( कल्याण )
खा. धैर्यशील माने ( हातकणंगले )
खा. नवनीतकौर ताई राणा ( अमरावती )
खा. राहूल शेवाळे ( दादर )
खा. प्रतापराव जाधव ( बुलढाणा )
खा. ओमराजे निंबाळकर ( धाराशिव )
खा. डॉ. भारतीताई पवार ( दिंडोरी )
खा. हिनाताई गावित ( नंदुरबार )
खा. रक्षाताई खडसे ( रावेर )
खा. डॉ. प्रितमताई मुंडे ( बीड )
खा. डॉ. सुजय विखे पाटील ( नगर )
खा. उन्मेष पाटील ( जळगाव )
आ.रवी राणा

या खासदारांनी प्रत्यक्ष येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार असल्याचे देखील संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

सक्रिय पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने, ‘समाजाचा घटक’ या नात्याने संभाजी राजे यांनी यावेळी आभार व्यक्त केले. आता बऱ्याच खासदारांनी संसदेत आवाज उठवायला सुरुवात केली आहे, त्यांचेही समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत आणखीन बाकीचे खासदार देखील येऊन भेटणार असल्याचे संभाजीराजेंनी यावेळी म्हंटले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील असा विश्वास यावेळी खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला.