आजकाल अनेक तरुणांनासुद्धा हृदयविकाराचे आजार होतोना पाहायला मिळते. आठवड्यात तब्बल १२ अंड्यांचे सेवन केल्यास ह्रद्यरोग टाळता येऊ शकतो, असे असे ‘अमेरिकी जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये संशोधन करून लिहिण्यात आले आहे.
अंड्यामध्ये प्रथिने आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अंड्याचे सेवन हे आरोग्यास लाभदायी आहे. दररोज दोन अंडी खाल्याने ह्रद्यविकार, मधुमेह अशा आजारांपासून दूर राहता येणार असल्याचे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी स्पष्ट केले. दररोज दोन अंडी खाल्याने ह्रद्यविकार, मधुमेह, डोळ्यांचे आजार टाळता येतात. त्याचबरोबर निरोगी गर्भधारणा आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही अंड्यांचा उपयोग होतो.
तुम्ही जर आठवड्याला किमान 3 ते 6 अंडी आहारात समाविष्ट करत असाल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात हृदयविकारापासून वाचू शकता. परंतु अंड्याचे जास्त सेवनही शरीरासाठी घातक आहे असेही एका इतर संशोधनातून समोर आले आहे.