ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी सुनयना होले या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह टीका केली जात होती. उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Bailable offense registered, Bail Done
Spoken to concerned officials
Will ensure a fair investigation on the charges pressed! https://t.co/HCJysxxyay
— Devang Dave (@DevangVDave) August 6, 2020
दरम्यान, या महिलेवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच भाजप नेते ताजिंदर पाल बग्गा यांनी मुंबईतील भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते. यानंतर महिलेला जामीनावर सोडण्यात आले असून, सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे.