IMPIMP
eknath shinde vs uddhav thackeray (1) eknath shinde vs uddhav thackeray (1)

विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या ११ जागांसाठी येत्या १२ जूलै रोजी निवडणुक पार पडणार आहे. त्याचदिवशी मतदान आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपच्या ५ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. यासाठी आता उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पाच जणांची यादी घोषीत करण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार भावना गवळी आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी काल आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ 

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

Leave a Reply