विरार : तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रातही मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तौक्ते वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या. “या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.
16-17 मे रोजी आलेल्या तौत्के चक्रीवादळाने वसई-विरार समुद्र किनाऱ्याला मोठा फटका बसला होता. याच परिसरात न्यू लाईफ फाऊंडेशन हे वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिक्षिका सुमन जवळपास दोन डझन वृद्धांसह राहतात. तौत्के चक्रीवादळाने या वृद्धाश्रमाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या शिक्षिकेने आता आपल्या विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.
Read Also :
- उजनीचा पाणीप्रश्न पेटला, शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन
- ‘इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो’
- ‘ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली’
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती