मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज 62 वा वाढदिवस आहे. ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मातोश्रीवर शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. माझ्या वाढदिवसाला फुलांचे गुच्छे नको, भेट दयायची असेल तर सदस्य नोंदणीचे अर्ज आणि शपथपत्राचे गठ्ठे दया असा आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तर शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळलेला दिसत आहे.
“देव करो, तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो”; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला चिमटा
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. शिवसेनेतील फुट रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. शिवसेना शाखेच्या उदघाटनावेळी माझ्या वाढदिवसाला फुलांचे गुच्छे नको, भेट दयायची असेल तर सदस्य नोंदणीचे अर्ज आणि शपथपत्राचे गठ्ठे दया असा आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी अर्जाचे गठ्ठे भेट दिले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी अनेकांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या”; राणेंनी यादीच वाचून दाखवली
वारकऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांना तुळशीचा हार घालत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मातोश्रीवर शिवसैनिकांनी रांगा लावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रात्री पासुनच शिवसैनिकांनी मातोश्रीवर जल्लोष केला आहे. पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी दगडुशेठ गणपतीला उद्धब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरती केली. वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांचे जितके वय आहे तितका म्हणजे 62 किलेचा प्रसाद दाखवला आहे.
“उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतो, अंगात कपटीपणा अन् खोटारडेपणा”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसर भाग आज प्रसिद्ध करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. एकदा निवडणुका होऊन जाऊ द्या, पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. शिवसेनेचं तुफान कायम आहे. लोकांच्या मानात, ह्रदयात कायम आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचं तुफान येईल, असं शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे म्हणाले.
Read also
- “तुमच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत इतका पझेसिव्ह पणा का?” मनसेचा सवाल
- ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळत शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- “युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी देश सांभाळा म्हटलं होतं, यांनी तर..”; ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागणारच”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं तुफान निर्माण कराव लागेल”; उद्धव ठाकरे