IMPIMP
Uncle-nephew in Baramati assembly Yugendra Pawar gave the signal to the Legislative Assembly Uncle-nephew in Baramati assembly Yugendra Pawar gave the signal to the Legislative Assembly

विधानसभेलाही बारामतीत काका-पुतण्या ? युगेंद्र पवारांनी दिले विधानसभेचे संकेत

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी आता विधानसभा निवडणुकीकडे विशेष लक्ष घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघात गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. यातच सुप्रिया सुळे यांच्या विजयी प्रचारात युगेंद्र पवारांनी महत्वाची भूमिका पार पडली होती. यावेळी शरद पवारांसोबत आता युगेंद्र पवार देखील उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे बारामतीत पुन्हा विधानसभेला देखील काका-पुतण्यामध्ये संघर्ष होणार का ? अशी चर्चा सुरू झालीय.

हेही वाचा..लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू 

लोकसभा निवडणुकीनंतर आता बारामती विधानसभेची चर्चा सुरू झालीय. यातच आता विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांचे नाव पुढे येत आहे. बुधवारी काटेवाडी येथे युगेंद्र पवार यांनी याबाबत सुचक वक्तव्य करून आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या नावाच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

काटेवाडीत बोलतांना युगेंद्र पवार म्हणाले की, संपुर्ण बारामती आपलं घर असलं, तरीसुद्धा आपलं मुळ गाव काटेवाडी आहे. सर्वात दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला. इथल्या अनेक स्थानिक पुढाऱ्यांकडून झाला. तुम्हाला सोपा प्रश्न आहे की, साहेब बारामतीचे नसते तर आज बारामती अशी असती का ? साहेबांमुळे बारामतीचचा खरा विकास झाला. असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत असं सांगितलं, की लगेच खुर्ची आणि मान मिळतो. आताच्या वेळी पैशांचा वापर झाला. पण ३ महिन्यांनी  तुम्ही त्यांना दाखवून द्या की१०० मतांनी आपण पुढे कसं पाहिजे. तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो अशा शब्दात युगेंद्र पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले.

READ ALSO :

हेही वाचा…” माझं भाग्य की देशाचा प्रधानमंत्री आज निम्म्या वेळेला माझं नाव घेतो, काय साधीसुधी गोष्ट आहे का?”, शरद पवारांनी डिवचलं 

हेही वाचा..“रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये ;” थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस 

हेही वाचा…“जागावाटपाची बोलणी करायला आता मला घेऊन चला, १०० सिट्स मागा”, कदमांची शिंदेंकडे मागणी 

हेही वाचा…“मोदींना आमंत्रण देतोय, विधानसभेला प्रचार आतापासून सुरू करा”, ठाकरेंनी मोदींना डिवचलं 

हेही वाचा..कार्यक्रम सुरू असताना वीज गेली, लंकेंनी थेट कार्यक्रमातच वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला झापलं 

Leave a Reply