सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांदेखील कोरोनाने आपल्या जाळयात पकडले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते.
बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. थोरातांच्या शासकीय बंगल्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. थोरात यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली होती. काल रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान, सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये ते कोरोनाने लोकांचे जगणेच अशक्य केले