मुंबई : राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर 12 सदस्य पाठवले जाणार आहेत. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी 4 आमदार असतील. मात्र आता राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
उर्मिला मातोंडकरने मार्च 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तसेच उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला होता.
आता विधानपरिषदेच्या सदस्य नियुक्तीवरून पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.