विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी हे वजन वापरुन निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले, “आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्यांचं काम आहे. त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. 18 जुलै रोजी फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केलाय, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे.
तसेच “18 जुलै रोजी प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे. एनडीआरएफमधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. NDRF च्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी.” असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.